ठाणे

एसी लोकलला प्रवाशांचा विरोध;बदलापूर स्टेशन मास्तरला प्रवाशांचा घेराव

बदलापूर रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ६.५५ ची एसी लोकल सुरू करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

एसी लोकलला विरोध दर्शविण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर संध्याकाळच्या सुमारास २०० ते २५० प्रवाशांनी एकत्र येत स्टेशन मास्टरला घेराव घातला. त्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.

बदलापूर रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ६.५५ ची एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. ती रद्द करून त्या जागी साधारण लोकल सुरू करावी, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. ही लोकल सुरू झाल्याने साधारण लोकल रद्द करण्यात आली आहे. शिवाय एसी लोकल सुरू झाल्याने तिचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्याच्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. याच प्रकारचे निवेदन देण्यासाठी स्टेशन मास्तरला प्रवाशांनी घेराव घातला. या आधी देखील स्टेशन मास्तरला प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांची कोणतीही दखल रेल्वे प्रशासनाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे सोमवारी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत