ठाणे

घरफोडी करणारा गजाआड; १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Swapnil S

डोंबिवली : घरफोडी करून पळून जाणाऱ्या आरोपीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. अटक आरोपींकडून १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनु केदारे (१९) असे अटक आरोपीचे नाव आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आयरेगाव, रूम नं. ७२, ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, डोंबिवली पूर्व येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरात आकाशने प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा १,१०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी सपोनि सानप, पोहवा वाघ, पोहवा सरनाईक, पो.ना. कोती पोअं पोटे, पोअ सांगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आकाश हा ज्योतीनगर, आयरेगाव डोंबिवली पूर्व येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने आकाशचा आयरेगावमधील ज्योतीनगर झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ पाठलाग करून अटक केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस