ठाणे

पावसापासून संरक्षण करणाऱ्या वस्तू महागल्या

aravind gurav

वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी पेणकरांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत किमतीत २५ टक्के वाढ झाल्याने पावसापासून संरक्षण करणाऱ्या या वस्तू सामान्यांना महागाईचे चटके देत आहेत. या वस्तूंसाठी लागणारे पॉलिस्टर कापड पेट्रोलियम संबधित उत्पादन आहे. गत वर्षभरात पेट्रोलच्या किमतीचा भडका आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे पॉलिस्टर महागले आहे. त्यातच या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याने आयातीवर देखील परिणाम झाला आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला पावसाळी खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिकही उन्हाळी उत्पादने बाजूला करून छत्री, रेनकोट, जुन्या घरांच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री, पावसाळी चप्पल अशा विविध वस्तू पुढे आणतात. महामारी काळात गत दोन वर्षे या बाजारात काहीसी मंदी होती. यंदा मात्र २० ते २५ टक्क्यांनी किमती वाढून महागाईचा भडका उडाला आहे.

विशेषता छत्र्यांचे दर २५ टक्के महागल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. छत्रीसाठी पॉलिस्टर कापड लागते. हे कापड पेट्रोलियम उत्पादनांशी संबंधित आहे. गत दीड-दोन वर्षांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर तब्बल ३० ते ४० रुपये महागले आहे. त्याचा परिणाम साहजिकच संबंधित वस्तूंवर देखील झाला आहे. त्यातच स्टीलचे दर वाढल्याने छत्रीसाठी लागणाऱ्या काड्यांच्या खर्चात देखील भर पडली आहे. वाहतूक आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. कच्च्या मालापासून ते कामगारांपर्यंतचा खर्च वाढल्याने छत्री बाजाराला महागाईच्या झळा बसत आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व त्याचबरोबर मुंबई, उल्हासनगर, लुधियाना या ठिकाणांहून छत्र्यांची आवक होते. छत्रीबरोबरच रेनकोटवरचे दरही २० टक्क्यांहून महागले आहेत. रेनकोटच्या कच्चा मालाची महागाई आणि वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिक सांगतात.

नागरिकांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून मागणी सुरू झाली आहे. मात्र, दरात २० ते २५ टक्के वाढ झाल्याने एकाच वेळी बुकिंग करण्यापेक्षा व्यावसायिक टप्प्याटप्प्याने बुकिंग करत आहे. ग्रामीण भागात १२ व १६ काडी पारंपरिक छत्रीला, तर शहरी भागात फोल्डिंगच्या आणि बेबी अम्ब्रेलाला पंसती मिळत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक