ठाणे

न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करणे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगलट; कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

Swapnil S

उल्हासनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने न्यायालयाच्या बाहेर घोषणा देत मोर्चा काढणे भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांना हिललाइन पोलिसांनी अटक केली होती. आरोपींना शनिवारी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टात हजर करण्यात येणार होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते यांनी चोपडा कोर्टाच्या बाहेर मोर्चा काढून जोरजोरात गणपत गायकवाड यांच्या नावाने घोषणाबाजी केली.

त्यामुळे भाजप कार्यकर्ते गुड्डू खान, मोना शेठ, निलेश बोबडे, शिला राज, सूरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश टोल, सरिता जाधव, लावण्या दळवी, यशोदा माळी आणि इतर २५ ते ३० अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त