ठाणे

महसूल विभागाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा द्यावा - राजेश नार्वेकर

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते

प्रतिनिधी

महसूल विभागाच्या कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षापासून अधिकारी-कर्मचारी यांच्या जोडीदाराची देखील वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, अर्चना कदम, रोहीत राजपूत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना महसुल दिनाच्या शुभेच्छा देत महसुल विभाग काळानुरूप बदलतोय दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतासोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेऊन तंदुरुस्त राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले आहे. ठाणे जिल्हा महसुल प्रशासने त्यासाठी ठाण्यातील एका नामवंत रुग्णालयाच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी माफक दरात करून देण्याची सोय केली आहे. पुढील वर्षी अधिकारी कर्मचाऱ्याच्या जोडीदाराचीही आरोग्य तपासणी केली जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

मीरा-भाईंंदर महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; महापौरपद डिंपल मेहता, तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील

Mira-Bhayandar : सोसायटीच्या ऑडिटसाठी मागितली लाज; सनदी लेखापाल ACB च्या जाळ्यात