प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : 'त्या' स्कूल व्हॅनचालकाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर येथील एका प्री-स्कूलच्या स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्या असून, न्यायालयाने संबंधित स्कूल व्हॅनचालकाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर येथील एका प्री-स्कूलच्या स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्या असून, न्यायालयाने संबंधित स्कूल व्हॅनचालकाला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

गुरुवारी पुन्हा एका चार वर्षीय चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराच्या प्रयत्नाची घटना घडल्याने शहर पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहे. या प्रकरणी चार वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्कूल व्हॅनचालकाला पोलिसांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्याला २७जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित स्कूल व्हॅन ताब्यात घेतली आरोपीकडे असून, आरटीओकडील वैध स्कूल व्हॅन चालविण्याचा परवाना नसल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याच्यावर २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अनधिकृत प्री-स्कूलवर कारवाई नाही

बदलापूर परिसरात दहा अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आले असून, त्यापैकी तीन शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांनी दिली. कोणतेही प्री-स्कूल शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येत नसल्याने, त्यांच्याबाबत थेट निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बदलापूर शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, प्री-स्कूल शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित आणावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी केली आहे.

प्री स्कूल शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणार

प्री स्कूलमध्ये जाणारी चिमुकली बाळे कशी सुरक्षित राहतील, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्री स्कूल शिक्षण विभागाच्या अखत्यारित आणण्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. जरी या शाळा प्ले ग्रुप स्वरूपाच्या असल्या तरी शिक्षण दिले जाते, त्यामुळे त्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असल्या पाहिजेत, असेही विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी सांगितले.

सुवेंदू अधिकारी : ममतांचे उजवे हात ते 'भावी मुख्यमंत्री'

मुक्काम पोस्ट तमिळनाडू : वारेमाप आश्वासने पूर्ण करणे आव्हानात्मक

मुक्काम पोस्ट पश्चिम बंगाल : ममतांचा बालेकिल्ला ढासळला

मुक्काम पोस्ट केरळ : 'यूडीएफ'चे वादळ; केरळमध्ये राजकीय सत्तापालट; काँग्रेसचे पुनरागमन, भाजपचे खाते उघडले

मुक्काम पोस्ट आसाम : भाजपची पकड आणखी मजबूत