ठाणे

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ शिवसेनाच जिंकणार

शिवसेना वर्धापनदिनी संकल्प

नवशक्ती Web Desk

डोंबिवली : आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदार संघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. भाजपची साथ घेऊन हा मतदार संघ आपणच जिंकू असा संकल्प शिवसेना वर्धापनदिनी शिवसैनिकांनी केला आहे. यासाठी शिवसैनिक या मतदार संघात कामा लागले असून यासाठी शिवसेना नेत्यांकडून हालचाली सुरु झाल्याचे समजते.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०१४ ला मनसेकडून रमेश पाटील हे निवडणुकीत विजयी झाले. २०१९ साली मनसेने प्रमोद ( राजू ) पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर ही लढत अतितटीची झाली. पुन्हा मनसेचे इंजिन या मतदार संघात धावले. मात्र यंदा या मतदार संघात शिवसेनाच विजयी ठरेल असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मोरे म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती आहे. युती हिंदुत्वासाठी झाली आहे हे सर्वाना माहित आहे. दोन्ही पक्ष जोमाने जनतेची कामे करत आहेत. कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचा उमेदवार असेल आणि तो उमेदवार नक्कीच विजयी ठरेल. संपूर्ण कल्याण ग्रामीण शिवसेना भगवामय करू."

शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनी सदस्य नोंदणी सुरु होती. गेल्यावर्षी २९ हजार सदस्य नोंदणी झाली असून यावर्षी ५० हजार सदस्य नोंदणी करू असे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. गेली तीन दिवस डोंबिवली शहर शाखा, ग्रामीण येथे शिवसेनेकडून नागरिकांना मोफत दाखले शिबीर देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, समीर कवडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी