ठाणे

उल्हासनगरमधील धक्कादायक घटना; अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनमध्ये समाजसेवकाचे विषप्राशन

उल्हासनगर महानगरपालिकेत गुरुवारी धक्कादायक घटना घडली. शहरातील समाजसेवक श्रीकृष्ण मानकर यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनमध्ये विष प्राशन केले.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत गुरुवारी धक्कादायक घटना घडली. शहरातील समाजसेवक श्रीकृष्ण मानकर यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनमध्ये विष प्राशन केले.

श्रीकृष्ण मानकर यांनी शहरातील १२ अनधिकृत गाळ्यांवर प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे हे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनधिकृत गाळे उभारण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी पाच लाख रुपये घेतले आहेत. या घटनेनंतर, श्रीकृष्ण मानकर यांना तत्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या धक्कादायक घटनेमुळे उल्हासनगर शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले