ठाणे

१० वर्षापासून पावसाळ्यात चिखलेवाडी पाण्यातच;पूल बांधण्याची मागणी अपूर्णच

महसुल विभागाला देखील या वाडीबाबत कोणतेच सोयरसुतक राहीलेले नाही

पदमिनी राजपूत

गेल्या दहा वर्षापासून पावसाळा सुरू झाला की चिखले, कातकर वाडीतील ६९ कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतोच. येथे सगळ्याच कार्यसम्राटांच्या कामाचा विकास चालू असून ठाणे जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवारांच्या मतदार संघातील या चिखलेवाडीसाठी पूल बांधण्यात यावा ही येथील अादिवासींची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने पावसाळा सुरू झाला की येथील अदिवासी कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतो. महसुल विभागाला देखील या वाडीबाबत कोणतेच सोयरसुतक राहीलेले नाही.

गेल्या पावसाळ्यात या चिखले अदिवासी वाडीसाठी नउ लाख पन्नास हजार रुपये किमंतीच्या NDRF फायर बटालिया आर्मी पुणे येथून तत्कालीन तलाठी संतोष पवार यांच्या पाठपुराव्यानंतर बोटी आणल्या गेल्या. या नविन कोऱ्या बोटी फुटक्या निघाल्याने त्या बोटी अद्यापही तहसील विभागाच्या अडगळीत पडलेल्या आहेत. मुरबाडमधील महसुल खात्याच्या भोंगळ कारभाराचा फटका आज चिखलेवाडी भोगत आहे.वर्षभरापुर्वी आणलेल्या बोटीबाबत ठोस नियोजन न केल्याने हा पावसाळा ही असाच जातो की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. त्यातच कोणी ही नेते पुढारी या वाडीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत नसल्याने नव्या बोटी मिळण्याची आशाच येथील नागरिकांनी सोडून दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल