ठाणे

कंटेनरला लागलेल्या आगीत सहा बकऱ्यांचा मृत्यू

Swapnil S

ठाणे : पारसिक रेतीबंदर येथे विसर्जन घाटाजवळ ठेवण्यात आलेल्या कंटेनरच्या केबिनला मध्यरात्री आग लागली. या आगीत सहा बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जन दरम्यान साहित्य ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत कंटेनर ठेवण्यात आले होते. त्यामध्ये निर्मल महातो (३५) या इसमाने कंटेनरमध्ये बकऱ्या पाळल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कंटेनरमध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच महातो याने पळ काढला. जवळपास पावणेदोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत १ दुचाकी, ३ सिलेंडर,३ जनरेटर, १ कलर कॉम्प्रेसर, वेल्डिंग लोखंडी साहित्य, लाकडी फळ्या जळून खाक झाल्या. तर कंटेनरमध्ये असलेल्या ६ बकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त