ठाणे

नेरळ - माथेरान मिनी ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी २०३ प्रवाशांनी केला प्रवास, विस्टाडोम डबा लवकरच बसणार

पर्यटकांचे खास आकर्षण असलेली नेरळ - माथेरान सेवा आज बुधवार पासून सुरू झाली. सुट्टीनंतर मिनी ट्रेनची शिट्टीचा आवाज, इंजिनाचा धुर पुन्हा एकदा आकाशात पसरला. पहिल्या दिवशी माथेरानला जाण्यासाठी तब्बल २०३ प्रवाशांनी मिनी ट्रेनचा आनंद लुटला.

Swapnil S

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असलेली नेरळ - माथेरान सेवा आज बुधवार पासून सुरू झाली. सुट्टीनंतर मिनी ट्रेनची शिट्टीचा आवाज, इंजिनाचा धुर पुन्हा एकदा आकाशात पसरला. पहिल्या दिवशी माथेरानला जाण्यासाठी तब्बल २०३ प्रवाशांनी मिनी ट्रेनचा आनंद लुटला. या ट्रेनला लवकरच विस्टाडोम डब्बा जोडण्यात येणार असून पर्यटकांना मनमोहक दृष्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ८ जूनपासून नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ-अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद ठेवली होती. ही सेवा पुन्हा ६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मिनी ट्रेन सुरू झाल्याची माहिती मिळताच माथेरानला जाण्याचे नियोजन केलेल्या पर्यटकांनी नेरळ स्थानकातील तिकीट खिडकीवर तिकिटासाठी गर्दी केली होती. त्यानुसार सकाळी नेरळहून ८.५० वाजता पहिली ट्रेन नेरळ ते माथेरान दरम्यान चालविण्यात आली. यानंतर सकाळी १०.२५ वाजता नेरळ माथेरान दरम्यान दुसरी गाडी धावली. या दोन्ही ट्रेनमधून २०३ प्रवाशांनी प्रवास करत निसर्गाचे मनमोहक दृश्य अनुभवले.

या टेनला यापूर्वी विस्टाडोम डब्बा लावण्यात आला होता. या वातानुकूलित डब्याला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. हा डब्बा पुढील वीस दिवसांनंतर ट्रेनला जोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी सांगितले.

मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा दरवर्षी १६ऑक्टोबरला सुरू होते. परंतु यावर्षी ही सेवा २०दिवस उशिराने म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. एन डी एम -४०५ हे इंजिन जोडलेल्या मिनी ट्रेनला एक प्रथम श्रेणी तर तीन द्वितीय श्रेणी, एक गार्ड बोगी तर एक लगेज बोगी असे सहा डबे लावण्यात आलेले आहेत. नेरळ-माथेरान-नेरळ असे चार फेऱ्या या दररोज सुरू असतील.

मिनी ट्रेनच्या पहिल्या गाडीचे चालक पी के निराळा, या गाडीसाठी तिकीट तपासणी म्हणून अनुभवी भगत साहेब, गाडीचे लोको पायलट भानुदास ठाणगे यांच्या हस्ते श्री फळ वाढवून पूजा करण्यात आली.

यावेळीअसिस्टंट लोको पायलट लक्ष्मण हाबळे, ट्रेन मॅनेजर सचिन पाटील, संजय भगत रामदास कडव, सुनिल शेळके, पप्पू कुमार, हरीश चिंचोले, ब्रेक पोर्टर स्टाफ इलेक्ट्रिशन, माथेरान स्टेशनचे प्रबंधक विनय कुमार, यांच्पासह पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही काल माथेरानला येऊन गेलो. नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सूरू होणारं म्हणुन आम्ही आज पहिल्या मिनी ट्रेनची सफर केली अत्यंत आनंददायी निसर्गाचं मनमोहक दर्शन अनुभवता आले. लहानपणाची झूक झूक गाडी पुन्हा अनुभवता आली.

- नलिनी ओढे, पर्यटक

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव