आत्महत्या प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

विरार येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर सदर विद्यार्थी खाली पडला होता व त्याच्या डोक्याला मार लागला होता.

Swapnil S

वसई : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून सुमितकुमार सुनीलकुमार सरोज (१८) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. हा विद्यार्थी सातव्या मजल्यावर आपल्या मित्रांसोबत असताना खाली पडला. यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे वर्गात बसले होते. आवाज आल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर सदर विद्यार्थी खाली पडला होता व त्याच्या डोक्याला मार लागला होता.

सुमित हा विवा कॉलेजमध्ये बारावी सायन्समध्ये शिकत होता. सुमित विरार पूर्व मनवेलपाडा येथील राहणार होता. सातव्या मजल्यावरून पडताच त्याला त्वरितच विरार पश्चिम येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...