आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

आर्थिक विवंचनेतून नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आत्महत्या

Swapnil S

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो नेरळ सम्राट नगर येथे राहत होता. गेली नऊ महिने ग्रामपंचायतकडून पगार मिळाला नव्हता. त्यामुळे बँकेचे हप्ते थकल्याने नोटिसा आल्या होत्या. त्यातच घरात कमवता कोण नसल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. गणेश सकाळी आपल्या मित्रांना देखील भेटला होता.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सम्राट नगर वाडा येथे राहणारा गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधवने दुपारच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला लटकत जीवन संपविले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी आवाज दिला असता घराचा दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून पाहिले असता गणेश हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी नरक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दाखल झाले होते.

गणेशने खुर्चीवर उभे राहून पंख्याला लाल दोरीच्या साह्याने गळ्याला फास घेत लटकून आपले जीवन संपविले आहे.

ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार

एकूणच नेरळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमावून किमत मोजावी लागली आहे. तर आजही असे ४० हून अधिक सफाई कर्मचारी आहेत, ज्यांना नऊ महिने पगार मिळलेला नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याही घरी गणेशच्या घरच्या कुटुंबाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशच्या आत्महत्या मागे कोणाला दोषी ठरवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

चेन्नईसाठी करो या मरो; प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आवश्यक

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा