(छाया - दीपक कुरकु्ंडे)
ठाणे

रविवार ठरला प्रचाराचा वार; उमेदवारांची पदयात्रा आणि रॅलीवर अधिक भर

Maharashtra assembly elections 2024 : मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असल्याने रविवार हा सुट्टीचा दिवस ठाण्यातील राजकीय नेत्यांनी प्रचाराची संधी साधत ठाण्यात प्रचाराची राळ उठवली. उन्हातान्हाची पर्वा न करता सकाळपासूनच उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटीसाठी पदयात्रा आणि रॅलींवर विशेष भर दिला आहे.

Swapnil S

ठाणे : मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असल्याने रविवार हा सुट्टीचा दिवस ठाण्यातील राजकीय नेत्यांनी प्रचाराची संधी साधत ठाण्यात प्रचाराची राळ उठवली. उन्हातान्हाची पर्वा न करता सकाळपासूनच उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटीसाठी पदयात्रा आणि रॅलींवर विशेष भर दिला आहे. रविवारी सर्वच कुटुंबातील सदस्य एकत्र भेटणार असल्याने ही संधी उमेदवारांनी सोडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी रॅली काढत प्रचाराचा धुरळा उडवला. दिग्गज उमेदवारांसोबतच नवीन उमेदवारांमध्ये देखील सुट्टीच्या दिवशी प्रचाराचा जोर दिसून आला.

ठाण्यातील प्रमुख चार मतदारसंघातील निवडणुका निर्णायक ठरणार असून यामध्ये दिग्गज उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात केदार दिघे तर काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचा विजय सोपा असल्याचे बोलले जात असले तरी या मुख्यमंत्र्यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. रविवारी संध्याकाळी भव्य रॅली काढून निवडणुकीचा धुरळा उडवून दिला. तर केदार दिघे आणि मनोज शिंदे यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला.

बऱ्याच ठिकाणी महायुती- मविआ आघाडीच्या उमेदवारामध्येच मुख्य लढत होत असली तरी ठाणे शहर मतदारसंघात भाजप महायुतीच्या संजय केळकर यांच्यासमोर मविआच्या राजन विचारे यांच्यासह मनसेच्या अविनाश जाधव यांनीही दंड थोपटले आहेत. तिघांनी सुट्टीच्या दिवशी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. ओवळा-माजिवड्यात महायुतीच्या प्रताप सरनाईक यांनीही रविवारी ठाणे ते थेट मिरा - भाईंदरपर्यत प्रचार केला.

या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले उबाठा पक्षाचे नरेश मणेरा यांनी देखील रविवारी मतदारसंघ पिंजून काढल्याचे पहावयास मिळाले. तर मनसेच्या संदीप पाचंगे यांनी देखील घरोघरी जाऊन मतदारांच्यात भेटीगाठी घेण्याचा रविवारी सपाटा लावला. दुसरीकडे गुरु शिष्य अशी लढत होत असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्रा तसेच कौसा भागात प्रत्येत मतदारांपर्यंत पोहाचण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाडांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांना नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर नजीब मुल्ला यांनी देखील रविवारच्या दिवशी रॅली आणि पदयात्रेवर भर दिला.

निवडणूक चिन्ह पोहोचविण्याची उमेदवारांची धडपड

आपापले निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचविण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी उन्हाची पर्वा न करता मतदारांना साकडे घातले. पहाटेपासूनच मॉर्निंगवॉक आणि रॅलीमध्ये उमेदवारांसोबतच पक्षीय उपरणे घातलेले गर्दीचे लोंढे गल्लोगल्लीत दिसत होते. निवडणूक चिन्ह मतदारांना समजून सांगताना प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी व्यस्त असल्याचे दिसून आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी