ठाणे

ठाण्यात पहिल्याच दिवशी १ कोटी ८० लाखांचा कर भरणा; पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद १५७० करदात्यांनी भरला कर

ठाणे महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके, एक एप्रिल रोजीच करदात्यांपर्यत पाठवली आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके, एक एप्रिल रोजीच करदात्यांपर्यत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश (एसएमएस) मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे १५७० जागरूक ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटी ८० लाखांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

मोबाइलवर पाठवण्यात आलेल्या लघुसंदेशात सन २०२५-२६ या वर्षांची देयके डाऊनलोड, छपाई करणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून (ऑनलाइन पद्धतीने) मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंद्रावर मालमत्ता कर भरण्याच्या सुविधेसह सुरुवात करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची देयके छपाई करून प्रभाग स्तरावर करदात्यांस वितरीत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. करदाते कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावरून तसेच कर संकलन केंद्रावरून विनंतीद्वारे उपलब्ध करून घेता येणार असल्याची माहिती उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी दिली. पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्यासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित महापालिकेकडे जमा केल्यास सवलत देण्यात आली आहे.

करदात्यांची डिजिटल पेमेंट पद्धतीला पसंती

ठाणे महापालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ८१० कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या ९५ टक्के एवढा मालमत्ता कर संकलीत करण्यात महापालिकेस यश मिळाले आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच नव्या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्याकरिता मालमत्ता कर विभागाकडून अशाप्रकारेच नियोजनबध्द प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ७०२ कोटी रुपये एवढ्या मालमत्ताकराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने १०८ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.

डिजिटल भरणा करण्यास करदात्यांची पसंती

ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे,यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ८८.४८% मालमत्ता कर हा डिजिटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

खालील लिंकव्दारे कर भरण्याची सुविधा

ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर भरून उपरोक्त सवलतीचा लाभ घ्यावा. ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच Googlepay, PhonePe, PayTm, BHIM App याद्वारे कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल