प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली ७७ हजारांची लाच; ACB ने ठोकल्या दोघांना बेड्या

एका अनुदानित शाळेत महिला तक्रारदाराच्या मुलीला प्रवेश मिळवून देण्यासाठी ७७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Swapnil S

ठाणे : एका अनुदानित शाळेत महिला तक्रारदाराच्या मुलीला प्रवेश मिळवून देण्यासाठी ७७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एसीबीने सोमवारी राबोडी परिसरातील संबंधित शाळेबाहेर सापळा रचून आरोपींना लाच घेताना पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संतोष नवलगी यांनी सांगितले की, आरोपी फातिमा अन्सारी आणि चैतन्य प्रधान यांनी तक्रारदाराच्या मुलीला इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी एकूण १.२ लाख रुपयांची मागणी केली होती. शाळेचे अधिकृत शुल्क २२,७०० रुपये वगळता, उर्वरित ७७,३०० रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना ‘एसीबी’ने पकडले. शाळेच्या मुख्याध्यापकांवर वजन वापरून काम करून देण्याच्या बहाण्याने आरोपी ही रक्कम मागत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिनेता इम्रान खानची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'बहुतेक मी ड्राईव्हला…

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता