बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवा प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक बांधकामस्थळांवर आवश्यक उपाययोजना न केल्याने शहरातील हवा प्रदूषित होत असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवा प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक बांधकामस्थळांवर आवश्यक उपाययोजना न केल्याने शहरातील हवा प्रदूषित होत असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सध्या ठाणे शहराची हवा 'मध्यम प्रदूषित' गटात मोडत असून, महापालिकेकडून विविध उपाययोजना करूनही प्रदूषणात अपेक्षित घट होताना दिसत नाही. विशेषतः सकाळच्या वेळेत हवेची गुणवत्ता आणखी खालावत असल्याचे निरीक्षण आहे. हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी मिस्ट स्प्रे यंत्रणा बसविण्यात आली असून अन्य उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत. मात्र, त्याचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकाच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने १ ते २२ जानेवारी या कालावधीत शहरातील सुरू असलेल्या ३३ बांधकामस्थळांची तपासणी केली. यामध्ये २८ ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले संबंधित बांधकाम असून व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. काहींवर थेट दंडात्मक कारवाई - करण्यात आली असून आतापर्यंत - एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, बांधकामस्थळांवर काही हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी यंत्रणा तसेच मिस्ट स्प्रे बसविण्यात - आले असले तरी शहरातील हवा - अद्याप मध्यम प्रदूषित गटातच - मोडत आहे.

शहरात वाढत असलेली - वाहनसंख्या हे देखील प्रदूषणाचे एक प्रमुख कारण ठरत आहे. सकाळ, दुपार आणि सायंकाळी शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूककोंडी होत असून त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरातील विविध खासगी दवाखान्यांमध्ये दररोज ५० ते ६० रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारींसह उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

पायाभूत प्रकल्पांची प्रदूषणात भर

शहरात मेट्रोसह कोस्टल रोड, फ्री वे आणि बोरिवली टनेल यांसारख्या पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असल्यानेही प्रदूषणात भर पडत आहे. फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सरासरी ११५ इतका नोंदविण्यात आला आहे. शाहू मार्केट, नौपाडा येथे AQI ११२, वर्तक नगर परिसरात १२८, कोपरी प्रभाग कार्यालय परिसरात १२३, कासारवडवली येथे १०२ तर उपवन परिसरात १०९ इतका AQI नोंदविण्यात आला आहे. सध्या ठाणे शहर 'पिवळ्या' गटात मोडत असून या गटातील AQI १०१ ते २०० दरम्यान असतो.

तक्रारीसाठी हेल्पलाइन

हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून प्रदूषणासंदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी हेल्पलाइन व व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी छायाचित्रांसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती