Thane : छटपूजेसाठी शहरात भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती; गर्दी नियंत्रणासाठी यंदा प्रथमच टोकन व्यवस्था प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : छटपूजेसाठी शहरात भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती; गर्दी नियंत्रणासाठी यंदा प्रथमच टोकन व्यवस्था

दिवाळीनंतर आता ठाणे शहरात छटपूजेची तयारी सुरू झाली आहे. उत्तर भारतीय समाजाच्या श्रद्धेचा महत्त्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी उपवन तलाव परिसरातील पायलादेवी मंदिराजवळ भव्य कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. भाविकांसाठी विविध सोयीसुविधांसह यंदा प्रथमच टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : दिवाळीनंतर आता ठाणे शहरात छटपूजेची तयारी सुरू झाली आहे. उत्तर भारतीय समाजाच्या श्रद्धेचा महत्त्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या निमित्ताने १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी उपवन तलाव परिसरातील पायलादेवी मंदिराजवळ भव्य कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. भाविकांसाठी विविध सोयीसुविधांसह यंदा प्रथमच टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या सहकार्याने रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून या ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जात असून, यंदा उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. त्यामुळे उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी आयोजकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. छटपूजा हा सूर्यदेव आणि छट मईया यांच्या उपासनेचा पारंपरिक सण असून, या काळात हजारो भाविक उपवन परिसरात पूजा-अर्चा करण्यासाठी येतात. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.

रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. धनंजय सिंह आणि जय फाऊंडेशनचे ॲड. अमित सिंह यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पायलादेवी मंदिर परिसरातील तयारीची पाहणी केली.

आयुक्तांकडून पाहणी

१५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. रायलादेवी, उपवन आणि मासुंदा तलावांवरील घाटांची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. रायलादेवी तलाव, उपवन तलावातील बनारस घाट तसेच मासुंदा तलावातील दत्तघाट आणि अहिल्यादेवी होळकर घाट येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी उपआयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी घाटांवर बॅरिकेडिंग, मंडप, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, ड्रोन आणि प्रकाशयोजना करण्यात आली आहे. तसेच स्वच्छता, निर्माल्य कलश, फिरती शौचालये आणि कचरा संकलनाची व्यवस्था केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूलपाठोपाठ आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीच्या हालचाली सुरू

विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त