अजित पवार  संग्रहित छायाचित्र
ठाणे

Thane : ...तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार; NCP अजित पवार गटाचा इशारा

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीकडून योग्य तो सन्मान आणि जागावाटप न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा ठाम इशारा पक्षाने दिला आहे.

Swapnil S

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीकडून योग्य तो सन्मान आणि जागावाटप न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा ठाम इशारा पक्षाने दिला आहे. शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने महायुतीत राष्ट्रवादीची कोंडी होत असल्याचे चित्र असून, याबाबत पक्ष आक्रमक भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले की, "२०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. यापूर्वी आमच्याकडे ३८ नगरसेवक होते आणि तेवढ्याच जागा आम्ही यंदाही मागणार आहोत. मात्र, महायुतीत आमच्या पक्षाचा योग्य मानसन्मान झाला नाही, तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार आहोत."

‘आमच्याकडे ४०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. प्रत्येक प्रभागात पॅनल उभे करण्याची तयारी पूर्ण झाली असून, दोन महिन्यांपूर्वीच आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. सध्या पक्षाकडून अंतिम निर्देश आलेले नसले, तरी स्वबळाची संपूर्ण तयारी आमची झाली आहे.’

ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका भक्कम असून, नागरिकांसमोर जाण्यास आम्ही सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले. “भाजपसोबत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही आणि नसणारही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचारात घेतल्याशिवाय ठाण्याचा महापौर बसू शकणार नाही, असा ठाम विश्वास मला आहे,” असेही मुल्ला म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार असून, १०० टक्के नवी फळी उभी करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग