Thane : रुग्णालयातील जेवणात सापडले झुरळ; ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी 
ठाणे

Thane : रुग्णालयातील जेवणात सापडले झुरळ; ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी

ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला जेवणाचे ताट दिले होते. रुग्ण जेवण घेत असताना ताटातील अन्नामध्ये झुरळ दिसून आले. हा प्रकार समोर येताच वॉर्डातील रुग्णांमध्ये तीव्र संताप उसळला. घटनेची माहिती मिळताच अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ वॉर्डात धाव घेऊन पाहणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. कळवा रुग्णालयात दररोज हजारो सामान्य नागरिक उपचारासाठी दाखल होतात. येथे दररोज सुमारे १ हजाराहून अधिक रुग्णांना जेवण पुरवले जाते. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जिवाशी थेट संबंधित असलेल्या अन्नाबाबत असा निष्काळजीपणा समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या गंभीर प्रकरणावर महिंद्रकर यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यभरात एफडीएकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत.

गुन्हे दाखल करण्याचा इशारा

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या प्रकरणी संबंधित जेवण पुरवठादार ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तसेच जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे मनसेचे जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा