ठाणे

दिव्यात व्यावसायिकाच्या बंगल्यावर नऊ दरोडेखोरांचा डल्ला; २.३९ लाखांचा ऐवज लंपास; बेडरूमचा दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न

दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री नऊ दरोडेखोरांनी व्यावसायिक तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी घरातील संतोष शेडगे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय आणि तोंड बांधले.

Swapnil S

ठाणे : दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री नऊ दरोडेखोरांनी व्यावसायिक तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी घरातील संतोष शेडगे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, मदतीसाठी संपर्क साधल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पळ काढला.

१७ नोव्हेंबर रोजी रात्री १.५३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंगल्याच्या देवघरामागील खिडकीची जाळी तोडून एका दरोडेखोराने आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा उघडून अन्य आठ साथीदारांना आत घेतले. पहिल्या मजल्यावरील बेडरूममधून १ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

दरम्यान, हॉलमध्ये झोपलेल्या संतोष शेडगे यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांचे तोंड रुमालाने, तर हात-पाय कापडाने बांधण्यात आले. त्यानंतर फिर्यादी मुंढे यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंढे यांनी मोबाईलवरून मदत मागितल्याचे लक्षात येताच दरोडेखोर पसार झाले.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नऊ अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वाद : पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड