Thane Election : ठाण्यात १७६ मतदान केंद्र संवेदनशील; निवडणूक शांततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त 
ठाणे

Thane Election : ठाण्यात १७६ मतदान केंद्र संवेदनशील; निवडणूक शांततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण २ हजार १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १७६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे ठाणे महापालिकेच्या निरीक्षणात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित केंद्रांवर अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Swapnil S

ठाणे : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून शहरात एकूण २ हजार १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १७६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे ठाणे महापालिकेच्या निरीक्षणात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित केंद्रांवर अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने शहरातील ३३ प्रभागांमधील मतदान केंद्रांचे सखोल सर्वेक्षण केले. मतदान केंद्रांची संख्या, दाट लोकवस्ती व बाजारपेठेचा परिसर, उमेदवारांमधील संभाव्य संघर्ष, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यालगत असलेली केंद्रे तसेच एका ठिकाणी मोठ्या संख्येने असलेले बुथ अशा विविध निकषांच्या आधारे संवेदनशील मतदान केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

या यादीत राबोडी, कळवा आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील काही मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली असून, झोपडपट्टी परिसर व राजकीय तणावाची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे.

उमेदवारांमधील चुरशीची लढत

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभाग क्रमांक ९, २३, २४ आणि २५ मधील काही मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. तर मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाट नागरीवस्ती, उमेदवारांमधील चुरशीची लढत व मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता प्रभाग क्रमांक २६, २८, ३०, ३१, ३२ आणि ३३ मधील निवडक बुथ संवेदनशील मानण्यात आले आहेत.याशिवाय दिवा परिसरातील प्रभाग क्रमांक २७ मधील एकमेव मतदान केंद्राचाही संवेदनशील केंद्रांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

पालिका व पोलीस प्रशासन सज्ज

संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, त्वरित प्रतिसाद पथके (क्विक रिस्पॉन्स टीम) आणि विशेष सतर्कता उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत पार पडावी, यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असे पालिका व पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

मतदार यादीत नाव सापडत नाहीये? BMC ने हेल्पलाईन क्रमांक केला जारी

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

'२५ वर्षे झाली, मला सोडा'; अबू सालेमच्या मागणीवर SC चा सवाल- २००५ पासून गणना कशी केली? नियमांबाबत स्पष्टीकरणही मागवले

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच