ठाणे

Thane : तोतया पोलिसांचा ज्येष्ठांना लाखोंचा गंडा

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठांना फसवण्याच्या घटना वाढत असून घोडबंडर रोडवरील आनंदनगर आणि वर्तकनगर या परिसरात एकाच दिवशी घडलेल्या घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने लंपास केेले.

Swapnil S

ठाणे : तोतया पोलिसांकडून ज्येष्ठांना फसवण्याच्या घटना वाढत असून घोडबंडर रोडवरील आनंदनगर आणि वर्तकनगर या परिसरात एकाच दिवशी घडलेल्या घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने लंपास केेले.

पहिल्या घटनेत घोडबंदर रोड परिसरात घडली. किरण वैद्य (६३) हे ४ एप्रिलला सकाळी मॉर्निंगवॉक करून परतताना दोघा भामट्यांनी त्यांना अडवले. इथे चेन स्नॅचिंग झाली आहे, दागिने काढून ठेवा, असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर कागदात दागिने गुंडाळून ठेवण्याचा बनाव करत त्यांना बोलण्यात गुंतवले आणि बनावट पुडी त्यांच्या हातात देऊन ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरला.

आगे पुलीस खडी है

दुसऱ्या घटनेत वर्तकनगरमधील पोखरण रोड क्रमांक १ परिसरात घडली. व्यंकटेश अय्यर (७७) हे मारुती दर्शनासाठी जात असताना एका इसमाने 'आगे पुलीस खड़ी है' असे सांगत त्यांना थांबवले. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या साथीदाराकडे नेऊन 'चेन बॅगमध्ये ठेवा' असा सल्ला दिला. अय्यर यांनी सोन्याची चेन काढली असता आरोपींनी ती हातचलाखीने बॅगमध्ये ठेवत असल्याचा बनाव केला. अय्यर यांची ३ लाखांची सोन्याची चेन चोरीला गेली.

'कोर्टाची दिशाभूल केली, आता परिणाम भोगा'; समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी ३ लाखांचा दंड

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती

Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

Mumbai : कलाप्रेमींसाठी पर्वणी! पाहा 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'ची खास झलक

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश