संग्रहित छायाचित्र  X|@ANI
ठाणे

Thane : घोडबंदर रोडवर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद, १२ ते १४ डिसेंबरदरम्यान वाहतूक निर्बंध; जाणून घ्या पर्यायी मार्ग

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर १२ ते १४ डिसेंबरदरम्यान रस्तादुरुस्ती व पुनर्डांबरीकरणाचे काम होणार असून या काळात जड वाहनांसाठी कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर रोडवर येत्या १२ ते १४ डिसेंबर दरम्यान नियोजित रस्तादुरुस्ती व पुनर्डांबरीकरणाच्या कामामुळे मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि ठाणे महापालिका (TMC) यांच्या संयुक्त देखरेखीखाली गाईमुख निरी केंद्र-काजुपाडा-फाऊंटन हॉटेल या दरम्यान डांबरीकरण व मॅस्टिक दुरुस्तीचे काम होणार आहे.

ठाणे वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, या तीन दिवसांत विशेषतः जड वाहतुकीसाठी (Heavy Vehicles) कडक निर्बंध असणार आहेत.

प्रवाशांनी पूर्वनियोजन करूनच प्रवास करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

जड वाहनांसाठी बंदी व पर्यायी मार्ग :

मुंबई आणि ठाणे →घोडबंदर रोड

सर्व जड वाहने वाई जंक्शन आणि कापुरबावडी जंक्शन येथे थांबवली जातील.

पर्यायी मार्ग : वाय जंक्शन- खरेगाव टोल प्लाझा-मानकोली- अंजनरफाटा-नाशिक रोड मार्गे पुढे प्रवास

कापूरबावडी-कासेली- अंजनरफाटा मार्गे पुढील प्रवास करता येईल.

मुंब्रा/कलवा→ घोडबंदर रोड

सर्व जड वाहने खरेगाव टोल प्लाझा येथे थांबवली जातील.

पर्यायी मार्ग : खरेगाव खाडी पुल - खरेगाव टोल - मानकोली - अंजनरफाटा मार्गे पुढील प्रवास.

नाशिक → घोडबंदर रोड

सर्व जड वाहने मानकोली नाका येथे थांबवली जातील.

पर्यायी मार्ग : मानकोली पुलाखालून उजवीकडे - अंजनरफाटा मार्गे पुढे.

हलकी वाहने (Light Vehicles)

ठाणे → घोडबंदर जाणाऱ्या हलक्या वाहनांना गाईमुख चौकीजवळून विरोधी दिशेच्या (wrong side) तात्पुरत्या डायव्हर्शनचा उपयोग करून फाउंटन हॉटेलच्या कटद्वारे पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन पुरवठा व इतर अत्यावश्यक सेवा वाहनांवर निर्बंध लागू होणार नाहीत. नवीन व जुन्या ओक्ट्रॉई नाक्यादरम्यानच्या खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सर्व ६ चाकी व १० चाकी मालवाहतूक वाहने पर्यायी मार्गावर वळवली जातील. कामकाजादरम्यान हलक्या वाहनांनाही काही प्रमाणात उशीर सहन करावा लागू शकतो.
- पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त वाहतूक नियंत्रण शाखा

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती