प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

ठाण्यात मेट्रोची चाचणी; मेट्रो-४ प्रकल्पामुळे ठाण्याचा प्रवास होणार गतिमान!

ठाणे शहराचे आणि लगतच्या मीरा-भाईंदर शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून, मी स्थानिक आमदार या नात्याने शहराच्या वेशीवर आलेली मेट्रो कासारवडवली पर्यंत वाढवावी, अशी मागणी केल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहराचे आणि लगतच्या मीरा-भाईंदर शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून, मी स्थानिक आमदार या नात्याने शहराच्या वेशीवर आलेली मेट्रो कासारवडवली पर्यंत वाढवावी, अशी मागणी केल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विधानसभेत लक्षवेधी मांडून मागणी केली. तसेच, तत्कालीन शिवसेना आमदार आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आंदोलने केली. सन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर, वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

ठाणेकरांना प्रवासासाठी सोयीस्कर व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. मेट्रोला मंजुरी मिळावी, यासाठी मी स्थानिक आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात मेट्रो कंदिलाची प्रतिकृती भेट दिली. तसेच, अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर 'मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर तुपाशी, ठाणे का उपाशी?' या घोषणेचे बॅनर झळकावून आंदोलन केले. अखेर एमएमआरडीएच्या माध्यमातून वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

स्वप्न साकार होत असल्याचा आनंद

आज मेट्रो-४ प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. स्थानिक आमदार म्हणून गेल्या १५ वर्षांपासूनच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, हे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद परिवहनमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. मी या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत