Thane : महावितरण कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Thane : महावितरण कर्मचाऱ्यासह दोघे अटकेत

नवीन वीजमीटर बसवून देण्यासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Swapnil S

ठाणे : नवीन वीजमीटर बसवून देण्यासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सुरुवातीला एक लाख ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर एक लाख २५ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. महावितरण कर्मचारी जयंत रामभाऊ शिवकर (५१) आणि खासगी व्यक्ती दर्शन शशिकांत साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोपरीतील मंगळा हायस्कूलजवळ तक्रारदाराचा बांधकाम व्यवसाय सुरू आहे. या ठिकाणी तात्पुरते नवीन वीजमीटर बसवून देण्यासाठी शिवकर आणि साळवी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत २४ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने काशी आई मंदिर चौक परिसरात सापळा रचला. तक्रारदाराच्या मोटारीत शिवकर याने एक लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्याने नोटांचे एक बंडल मागील सीटवर बसलेल्या साळवीकडे मोजण्यासाठी दिले. याचवेळी एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार