Thane : सात महिन्यांत ४९८ कोटींची मालमत्ता कर वसुली संग्रहित छायाचित्र
ठाणे

Thane : सात महिन्यांत ४९८ कोटींची मालमत्ता कर वसुली

ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीला वेग दिला असून, १ एप्रिल ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ४९८.५२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीला वेग दिला असून, १ एप्रिल ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ४९८.५२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कराच्या माध्यमातून १२०० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने प्रशासनाची वाटचाल सुरू आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी विविध उपाययोजना राबविण्याबरोबरच करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीची सर्वाधिक वसुली

महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने सर्वाधिक १६४.०४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. त्याखालोखाल वर्तकनगर प्रभाग समितीने ७८.८० कोटी रुपये, तर नौपाडा-कोपरी प्रभाग समितीने ६८.०५ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. कळवा प्रभाग समितीत सर्वांत कमी १५.१८ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांमधील संकलन केंद्रे तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील संकलन केंद्रे कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत.

ऑनलाइन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध

मालमत्ताधारकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, धनादेश, डिमांड ड्राफ्ट (डीडी) आणि रोखीने मालमत्ता कर भरता येतो. याशिवाय गुगल पे, फोन पे, भीम ॲॅप आणि पेटीएमच्या माध्यमातूनही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करणे शक्य झाले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ठाणे महापालिकेने ८७८ कोटी ३७ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा केला होता. यंदा हे उद्दिष्ट वाढवून १२०० कोटी रुपये करण्यात आले आहे. आतापर्यंत ४९८.५२ कोटी रुपयांची वसुली झाली असून, उर्वरित कालावधीत उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाकडून कर वसुलीच्या प्रयत्नांना आणखी गती देण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही