ठाण्यात प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ; प्रवासी-रिक्षाचालकांमधील संघर्ष टाळण्यास मदत 
ठाणे

ठाण्यात प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ; प्रवासी-रिक्षाचालकांमधील संघर्ष टाळण्यास मदत

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संघर्ष, रिक्षांच्या रांगा तसेच भाड्याबाबतची अनिश्चितता दूर करण्याच्या उद्देशाने प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

Swapnil S

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संघर्ष, रिक्षांच्या रांगा तसेच भाड्याबाबतची अनिश्चितता दूर करण्याच्या उद्देशाने प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सीचालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम ठाणे रेल्वे स्थानक येथे सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीपेड रिक्षा स्टँड आणि कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांच्या रांगा, रिक्षाचालकांमधील वाद आणि प्रवाशांशी होणारे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा विषय गेल्या दीड ते दोन वर्षांपासून चर्चेत होता. या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रीपेड रिक्षा व्यवस्था यापूर्वी उपलब्ध नसल्याने तिच्या अंमलबजावणीदरम्यान विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. रिक्षाचालक दिवसभर व्यवसाय करून मिळवलेले उत्पन्न त्याच दिवशी कुटुंबाच्या गरजांसाठी घरी घेऊन जातात. या उपक्रमाला तातडीने मान्यता देऊन ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

सिटी फ्लोचे व्यवस्थापन

या संपूर्ण सेवेचे नियोजन आणि व्यवस्थापन Cityfloच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांना अधिक कार्यक्षम, सुसूत्र आणि पारदर्शक सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेली ही प्रीपेड रिक्षा व्यवस्था ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी निश्चित भाडे, पारदर्शकता आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रिक्षाचालकांच्या उत्पन्नाचे अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळपासून दिवसभर केलेल्या व्यवसायाचा संपूर्ण हिशोब संध्याकाळी घरी जाताना रिक्षाचालकाच्या बँक खात्यात जमा होईल. सर्व रिक्षाचालकांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याचा मोठा फायदा होईल. या व्यवस्थेसाठी Cityfloचा देखील सहभाग लाभला आहे. प्रीपेड रिक्षा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार आहे. रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासासाठी प्रवाशांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष