ठाणे

Thane: थंडीच्या दिवसांत वाढत्या उष्णतेने ठाणेकर हैराण

ठाणे शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअस ओलांडत असून सलग वाढणाऱ्या उष्णतेमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.

Swapnil S

ठाणे : नोव्हेंबरमध्ये गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना घामाच्या धारा पुसाव्या लागत आहे. ठाणे शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअस ओलांडत असून सलग वाढणाऱ्या उष्णतेमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात ३० अंशांवर असलेले तापमान काहीच दिवसांत झपाट्याने वाढत ३५ अंशांपर्यंत गेले आहे.

पहाटे किंचित गारवा आणि दुपारच्या वेळी प्रखर उन्हाचा तडाखा या विसंगत हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जमिनीतील ओलावा, कोरडे वारे आणि सूर्याची तीव्रता वाढल्याने उकाड्यात भर पडत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान वाढीची शक्यता आहे. या वातावरणा बदलाचा आरोग्यावरही या उकाड्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

तापमान नोंद :

दिनांक कमाल - किमान

  • २१ नोव्हेंबर - ३३.२° - २१.६°

  • २२ नोव्हेंबर - ३४.२° - २२.७°

  • २३ नोव्हेंबर - ३४.७° - २३.६°

  • २४ नोव्हेंबर - ३४.८° - २३.७°

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक