बंदची अधिसूचना, पण शहाड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच; पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू नाहीच 
ठाणे

बंदची अधिसूचना, पण शहाड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूच; पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू नाहीच

ठाणे वाहतूक विभागाने ३ नोव्हेंबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत शहाड उड्डाणपुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली असली, तरी प्रत्यक्षात सोमवारी पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, पुलावरून दोन्ही दिशांनी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असून वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

राजकुमार भगत

उल्हासनगर : ठाणे वाहतूक विभागाने ३ नोव्हेंबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत शहाड उड्डाणपुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली असली, तरी प्रत्यक्षात सोमवारी पहिल्या दिवशी डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, पुलावरून दोन्ही दिशांनी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असून वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रस्त्यांचे काम सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि मे. संरचना कंपनीच्या वतीने शहाड उड्डाणपुलाचे डांबरीकरण ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते. या कालावधीत पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तथापी, सोमवारी दुपारपर्यंत पुलावर कोणतीही यंत्रसामग्री, कर्मचारी किंवा कामकाज दिसले नाही. नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करत म्हटले, पुल बंद ठेवण्याची अधिसूचना आली, पण कामाचे काहीच चिन्ह नाही.

नागरिकांमध्ये संभ्रम

अचानक वाहतूक बंदी लागू होईल या भीतीने अनेकांनी पर्यायी मार्ग वापरण्याची तयारी ठेवली होती. परंतु वाहतूक सुरू असल्याने सोमवारी वाहनचालकांना अडचण भासली नाही. तरी देखील प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. मात्र मंगळवारपासून काम सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला

Mumbai : सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC च्या ताब्यात द्या! अंधेरी विकास समितीचा उद्या आंदोलनाचा इशारा

पॅसेंजर ट्रेनचा डबा थेट मालगाडीवर चढला; छत्तीसगडच्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला

शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू