प्रातिनिधिक छायाचित्र 
ठाणे

ठाणेकरांचे तरण तलावात पोहणे झाले महाग; तीन वर्षांच्या सभासद शुल्कात १० ते २० टक्के वाढ, बघा नवे दर

ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेले कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कै. यशवंत रामा साळवी तलावात पोहायला येणाऱ्या सदस्यांच्या सभासद शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेले कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कै. यशवंत रामा साळवी तलावात पोहायला येणाऱ्या सदस्यांच्या सभासद शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या वर्षी १० टक्के, दुसऱ्या वर्षासाठी १५ टक्के आणि तिसऱ्या वर्षांसाठी २० टक्के अशी ही दरवाढ करण्यात येणार आहे. तरण तलाव चालवण्यासाठी येणारा खर्च आणि कर्मचाऱ्यांना वेतन देणे ठाणे महापालिकेला शक्य नसल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे ठाणेकरांचे पोहणे मात्र महाग होणार आहे.

गडकरी रंगायतन परिसरात कै. मारोतराव शिंदे तसेच कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव असून या तलावात मोठ्या संख्येने नागरिक पोहायला येत असतात. या ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. तर सहा महिने किंवा वार्षिक सभासद देखील करून घेण्यात येते. मात्र आता या सभासद शुल्कात वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. तरण तलाव चालवणे पालिकेला कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे तरण तलाव हे उत्पन्नाचे साधन नसून ना नफा ना तोटा या धोरणानुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु तरण तलाव चालवण्यासाठी येणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, यंत्रणा साधनसामुग्री, साफसफाई स्वच्छता करणे, विद्युत उपकरणे व त्यावर होणारा विद्युत खर्च तसेच तरण तलावाच्या उत्पन्नात व खर्चात मोठ्या प्रमाणात तूट यामुळे पालिकेला शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही तलावांकरिता सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता यापूर्वी दर मंजूर करण्यात आले होते. सदर वाढीची मुदत दि. मार्च २०२४ रोजी संपुष्टात आलेली असल्याने पुन्हा एकदा ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२३-२४ या वर्षाच्या प्रचलित दरावर सन २०२४-२५, २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता खालील प्रमाणे अनुक्रमे १० टक्के , १५ टक्के व २०टक्के इतकी शुल्कदरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश