ठाणे

गणरायाच्या स्वागताला ठाण्यातील बाजारपेठ सजली

बाजारपेठेत तेजीचे वातावरण असून गेल्यावर्षीच्या तुलनेत व्यवसायात मोठी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे

प्रतिनिधी

नोटाबंदी नंतरच्या काही वर्षात एकूण व्यवसाय ६० ते ६५ टक्के घटल्याने बाजारपेठात मोठ्या प्रमाणात मंदी असल्याचे चित्र होते. काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या आणि इतर सणाच्या दिवसात करोडोंची उलाढाल व्हायची ती आता लाखावर आली असल्याचे व्यापारी सांगत होते.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी मार्केट पुन्हा सावरू शकते अशी आशा व्यापारी व्यक्त करत असतानाच जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचा संसर्ग देशात झाला आणि देशात मोठा काळ लॉकडाऊन जाहीर करावा लागला. याचा परिणाम दोन वर्षांच्या सणावर झाला आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला. कोरोनामंदीची मरगळ झटकत बाजारपेठेत तेजीचे वातावरण असून गेल्यावर्षीच्या तुलनेत व्यवसायात मोठी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१६ साली झालेल्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर सकारात्मक बदला पेक्षा उद्योग व्यवसायावर चुकीचा परिणाम होऊन उलाढाल खूपच कमी झाली. २०२० सालची कोरोनाची पहिली लाट , त्यानंतर २०२१ ची कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर यावर्षीच्या सुरवातीला तिसऱ्या लाटेचे सावट यामुळे बाजारपेठेवर प्रचंड मंदीचे सावट असल्याचे चित्र होते, व्यवसाय कमी होतो त्यामुळे दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार ,लाईटबील हे भागवता येत नसल्याने दीड वर्षात ३० टक्के दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद केले असल्याचे व्यापारी सांगत होते. यंदाचा गणेशोत्सव काहीसा तेजीत असल्यामुळे बाजारपेठ चांगलीच गजबजली आहे. गणपतीचे पूजेचे साहित्य, लहान मुलांचे कपडे, मिठाई, साड्या आणि ड्रेसची दुकाने यांच्यात उलाढाल वाढली आहे.

रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्याकडे गर्दी होत होती मात्र दुकानदार गिऱ्हाईकांची वाट बघत असल्याचे चित्र होते. दरम्यान लोकांकडे पैसे नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली असल्याने बाजारपेठेत उलाढाल होत नाही, त्यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे. नवीन वर्षात काही तरी जादूची कांडी फिरेल आणि मंदीचे रूपांतर तेजीत होईल या आशेवर व्यापारी वर्ग बसला आहे.

महागाईचा फटका

नोटबंदी आणि त्यानंतर कोरोनाकाळ यामुळे अनेक वर्षे मंदीत गेले होते. त्या तुलनेत यंदा उलाढाल २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र यंदा गणेशाच्या मुर्ती, पूजेचे साहित्य, कपडे तसेच सजावट यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच नागरिकांचा उत्साह फार असला तरी आर्थिक उलाढालीचा फटका बाजारपेठ तसेच नागरिकांना देखिल बसला असल्याचे व्यवसायिक वसंत चौहान यांन ‘दै नवशक्ति’ला सांगितले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत