ठाणे

ठाण्यातील पाणीकपातीचे संकट टळणार, एमआयडीसीच्या पाईपलाईन बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात

ठाणे जिल्ह्यातून मुंबईला जो पाणीपुरवठा केला जातो ते पाणी मोठ्या पाईपलाईन मधून जाते.

प्रमोद खरात

ठाण्यातील नागरिकांना वेळोवेळी पाणीकपातीचा फटका सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीच्या जुन्या पाईपलाईन जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे , त्या वेळोवेळी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात होते. बहुतांशी पाईपलाईन ५० ते ६० वर्षे जुन्या असून त्या वेळोवेळी फुटू लागल्या होत्या. गेल्या काही वर्षात हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे या जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून ७.३३ किमी पाईपलाईन बदलण्याचे काम पूर्ण झाले असून शिळफाटा परिसरात १ किमी अंतरीची पाईपलाईन बदलण्याचे काम फक्त शिल्लक आहे.

ठाणे जिल्ह्यातून मुंबईला जो पाणीपुरवठा केला जातो ते पाणी मोठ्या पाईपलाईन मधून जाते. यापैकी तानसा जलाशयाच्या दोन पाईपलाईन असून त्यापैकी एक १९१५ सालची तर, दुसरी १९५४ सालची आहे. याच प्रकारे वैतरणा आणि अप्पर वैतरणाच्या पाईपलाईन या १९७३ च्या आहेत. तर भातसाकडून जाणारी पाईपलाईन स्वतंत्र आहे. ती अलीकडच्या काळातील असल्याने तिला फारसा धोका नाही. मात्र ज्या जुन्या पाईपलाईन आहेत. त्या जीर्ण झाल्या असल्याने त्या फुटून पाणी वाया जाण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १८ ऑगस्ट २०१४ रोजी हीच पाईपलाईन फूटून शेकडो झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या. वेळोवेळी या जुन्या पाईपलाईन फूटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे या पाईपलाईन बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. तानसा ते गोंदवली अशी जवळपास ४५ किमी लांबीचीपाईपलाईन तब्बल १ हजार ५० कोटी रूपये खर्च करून बदलण्यात आली आहे.

तीन वर्षांपूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिकेची पाइपलाईन फुटल्याने पाऊस पडला नसताना महापूर आला होता. हजारो झोपड्यात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले, आपत्कालीन तसेच अग्निशमन दलाने रस्सी, लाइफ जाकेट यांच्या मदतीने हजारो नागरिकांची सुखरूप सुटका केली. मात्र तरी १८ जण जखमी झाले होते. या महापुरामुळे वागळे इस्टेटमधील बहुतांशी भाग जलमय झाला होता. याचा फटका किमान १५ हजार रहिवाश्यांना बसला होता. तर, याच महिन्यात जांभूळ येथील एमआयडीसीच्या जलवाहिनीची फुटली होती, ती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.मात्र, काही वेळातच पुन्हा ती पाईपलाईन फुटली त्यामुळे नव्याने ती जलवाहिनी दुरुस्त करावी लागली. असे प्रकार गेल्या काही वर्षात वेळोवेळी होत असल्याने नागरिकांना पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले