ठाणे

भाईंदरमध्ये तरुणाला ऑनलाईन संकेतस्थळावर गंडवले

प्रतिनिधी

एका ऑनलाईन विक्री संकेतस्थळावर सायकल विक्रीसाठी जाहिरात देणाऱ्या भाईंदरमधील तरुणाला त्याच्या सायकलचे ४ हजार रुपये मिळाले नाहीच उलट ९६ हजार रुपये गमवावे लागले.

भाईंदर पूर्वेच्या नवघर गावातील डी एन इमारतीत राहणाऱ्या २४ वर्षीय चेतन शेट्टी ह्याने त्याची सायकल ४ हजार ५०० रुपयात विक्रीसाठी एका संकेतस्थळावर जाहिरात टाकली होती. त्यानुसार त्याला स्वतःला अंधेरी येथे रहात असल्याचे व मीरारोड येथे दुकान असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचा ३ जुलै रोजी कॉल आला. ४ हजार रुपयात खरेदी ची त्या व्यक्तीने तयारी दर्शवली व सौदा ठरला.

ऑनलाईन पैसे देतो सांगून त्याने शेट्टीला आधी क्यूआर कोड पाठवला व त्याद्वारे १ रुपया पाठवण्यास सांगितले. शेट्टी याने १ रुपया पाठवला असता त्याच्या खात्यात २ रुपये जमा झाले. त्या व्यक्तीने मग शेट्टी याला पुन्हा क्यूआर कोड पाठवत ४ हजार रुपये पाठव व तू ४ हजार पाठवले की तुला डबल रक्कम मिळेल असे सांगितले. शेट्टी ने त्याप्रमाणे ४ हजार पाठवले पण त्याला परत पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर शेट्टीने व १२ हजार व नंतर आणखी ३२ हजार रुपये पाठवले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल