ठाणे

१ कोटींच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भिवंडी : अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत घरातील बेडरूममधील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भिवंडीतील एका अपार्टमेंटमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी हद्दीतील आरिफ गार्डनजवळील एव्हर शाईन अपार्टमेंटमध्ये बी विंगच्या दुसऱ्या माळ्यावरील रूम नं.२०३ मध्ये मोहमद राकीब मोहमद सुलेमान माळी राहत आहेत. दरम्यान, ते १६ ते १९ जानेवारी २०२४ या कालावधीत कामानिमित्त कुटुंबासह औरंगाबाद येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करत मोहमद राकीब यांचे आई- वडील राहत असलेल्या बेडरूममध्ये प्रवेश करून एकूण १ कोटी ६ लाख रुपये किमतीच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला आहे. तर घरी परतल्यानंतर चोरीच्या घटनेची बाब लक्षात येताच मोहमदने २२ जानेवारी रोजी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. तर चोरीच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोउनि एस.एच. कुंभार करीत आहेत.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शेती बुडाली, डोळ्यात अश्रू! मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार; ८ जणांचा मृत्यू; शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण

समृद्धी महामार्गावर ५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीस प्रारंभ; देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

जनतेच्या पैशाचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला फटकारले