ठाणे

तरुणाच्या खून प्रकरणात दोघांना अटक

मृतदेहाच्या पायाला बांधण्यासाठी वापरलेला टी-शर्ट महत्त्वाचा पुरावा ठरला

Swapnil S

कर्जत : कर्जत मुरबाड रस्त्यावरील नालधे गावाजवळ एका तरुणाचा गळा चिरून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मृतदेहाच्या पायाला बांधण्यासाठी वापरलेला टी-शर्ट महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. याच टी-शर्टवरून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नेरळ, कर्जत पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग रायगडने संयुक्तपणे ही कारवाई केली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरच्या नालधे गावाच्या हद्दीत असलेल्या अबासा फार्महाऊसजवळ दि. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. हातपाय बांधलेल्या व गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह पोलिसांना मिळाला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तसेच खुनाचा उलगडा करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास चालू केला.

नेरळ पोलीस पथकाला मयत तरुणाचे हात व पाय बांधण्यासाठी वापरलेले कपड्यावर काही खुणा दिसून आल्या. सदर तपासादरम्यान मयत इसमाला ओळखणारा व त्यास वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कॅटरर्सचे कामावर मजुरीने लावणारा लेबर काँट्रॅक्टर दिलीप धनसानी यास पनवेल येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच व त्याचा सहकारी विजय रोळी वाघरी (३८) यांनी मिळून पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या केल्याचे कबूल केले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश