ठाणे

वसई, भिवंडीतील दोन महिला डॉक्टरांचा मध्य प्रदेशात अपघाती मृत्यू

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात महामार्गावर रविवारी सकाळी ८ वाजता कार उलटून दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य चार डॉक्टर जखमी झाले आहेत.

Swapnil S

शिवपुरी : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात महामार्गावर रविवारी सकाळी ८ वाजता कार उलटून दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य चार डॉक्टर जखमी झाले आहेत.

डॉ. तन्वी आचार्य (५०) व डॉ. नीलम पंडित (५५) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व डॉक्टर अयोध्येतून उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी लुकवासा पोलीस ठाणे क्षेत्रात शिवपुरी-गुनावर त्यांची कार अनियंत्रित झाली. यामुळे ती पलटी होऊन पुलावरून खाली कोसळली. हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते.

डॉ. अतुल आचार्य हे कार चालवत होते. कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याची मदत आली आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉ. अतुल आचार्य हे भिवंडीचे आहेत. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला.

जखमींमध्ये डॉ. उदय जोशी (६४, रा. दादर), डॉ. सुबोध पंडित (६२, रा. वसई), डॉ. अतुल आचार्य (५५, रा. भिवंडी) आणि डॉ. सीमा जोशी (५९) यांचा समावेश आहे. नीलम पंडित यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला, तर तन्वी आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण