ठाणे

तारापूरमध्ये माथेफिरूकडून दोन वृद्धांची हत्या; लपलेल्या आरोपीला अटक

माथेफिरू इसम दोन दिवसांपासून वेड्याप्रमाणे परिसरात कुऱ्हाडसदृश हत्यारासह वावरत होता

Swapnil S

पालघर : एका अज्ञात मानसिक रुग्णांकडून बोईसर जवळील तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कुडण येथील रहिवासी असलेले भीमराव पाटील (७२) व मुकुंद पाटील (८०) या दोन वयोवृद्ध व्यक्तींची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. या हत्याकांडातील आरोपी कुडण गावाच्या जवळील पोफरणच्या दलदलीच्या खाजणामध्ये लपून बसला असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील अधिक तपास सुरू असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

सदरचा माथेफिरू इसम दोन दिवसांपासून वेड्याप्रमाणे परिसरात कुऱ्हाडसदृश हत्यारासह वावरत असल्याची माहिती समोर येत असून हत्या केल्यानंतर हा इसम जवळच्याच झाडी झुडपातून पळाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान तारापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीचा शोध घेत पुढील तपास व कार्यवाही करत आहेत. या आरोपीस तारापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आरोपी सध्या इतर काहीही माहिती देत नसल्याचे समजते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली