ठाणे

दोन अल्पवयीन मुलांचा डोंबिवलीत बुडून मृत्यू

रविवार असल्यामुळे आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. दरम्यान खदानीच्या खोलीचा अंदाज न आल्याने सगळे बुडायला लागले.

वृत्तसंस्था

डोंबिवली जवळील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चार जणांना वाचवण्यात यश आले.

रविवार असल्यामुळे आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. दरम्यान खदानीच्या खोलीचा अंदाज न आल्याने सगळे बुडायला लागले. मुलांचा बुडतानाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खदानीजवळ धाव घेतली. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर तत्काळ अग्निशामन दलाला बोलविण्यात आले. याप्रसंगी अग्निशामन दल आणि गावकऱ्यांनी मिळून सहा पैकी चार जणांना वाचविले; मात्र यात आयुष केदारे (१३), आयुष गुप्ता (१४) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. तर कीर्तन म्हात्रे, पवन चौहान, परमेश्वर घोडके, अतुल औटे या मुलांना वाचवण्यात यश आले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत