ठाणे

उल्हास नदीत मुंबईचे दोन तरुण बुडाले

बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

अंबरनाथ : बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी या दोघांची नावे आहेत. ते मुंबईतील पवई हिरानंदानी आयटी पार्क परिसरात राहणारे होते. हे दोघे मित्र शनिवारी उल्हास नदीच्या वसत बंधाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. तेथे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले. दरम्यान, उल्हास नदीत बुडून मृत्यू होण्याच्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

Mumbai : गोरेगावच्या महाविद्यालयात ड्रेस कोडवरून वाद; विद्यार्थिनींच्या उपोषणानंतर बुरखा बंदी मागे

Kerala Election Results : 'जिंकले तर विश्वास अन् हरले तर ईव्हीएमवर आरोप...'; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा जोरदार हल्लाबोल