सेंचुरी रेयॅान शाळेसमोर खड्ड्यात कार कोसळली; स्थानिकांच्या तत्परतेने पाच जणांचा जीव वाचला 
ठाणे

Ulhasnagar : सेंचुरी रेयॅान शाळेसमोर खड्ड्यात कार कोसळली; स्थानिकांच्या तत्परतेने पाच जणांचा जीव वाचला

उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील सेंचुरी रेयॅान शाळेसमोर रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी कार रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या कारमध्ये एका महिलेसह पाच जण प्रवास करत होते.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील सेंचुरी रेयॅान शाळेसमोर रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी कार रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या कारमध्ये एका महिलेसह पाच जण प्रवास करत होते. अचानक कारचा ताबा सुटून ती थेट खड्ड्यात घसरल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. नागरिकांच्या तत्परतेमुळे कारमधील सर्व पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे योग्य प्रकारे सुरक्षित न ठेवल्याने अशा अपघातांची शक्यता वाढत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करून अपघात टाळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक

नवी मुंबईत पिण्याच्या पाण्यात कपात नाही; दररोजचा पाणी उपसा ४८० वरून ४०० एमएलडीपर्यंत आणणार