उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

उल्हासनगरात डेंग्यूने डोके वर काढले असून, लालचक्की परिसरातील १७ वर्षीय युग कृष्ण धामणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरात डेंग्यूने डोके वर काढले असून, लालचक्की परिसरातील १७ वर्षीय युग कृष्ण धामणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सुरुवातीला उल्हासनगरातील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, फोर्टिस रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील लालचक्की येथील वीनस रोडवरील एका गृहसंकुलात युग कृष्ण धामणे हा आपल्या कुटुंबासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता. तापाची तीव्रता कमी-जास्त होत असल्याने कुटुंबीयांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ततपासणी करण्यात आली असता युगला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन