ठाणे

उल्हासनगर : बांधकाम क्षेत्रातील प्रदूषणाबाबत पालिकेची नवीन नियमावली

दिवाळीसह इतर सणांदरम्यान हवेच्या गुणवत्तेत होत असलेली घट या पार्श्वभूमीवर, उल्हासनगर महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम' ते 'खराब' स्तरावर पोहोचला आहे.

नवनीत बऱ्हाटे

नवनीत बऱ्हाटे / उल्हासनगर

दिवाळीसह इतर सणांदरम्यान हवेच्या गुणवत्तेत होत असलेली घट या पार्श्वभूमीवर, उल्हासनगर महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम' ते 'खराब' स्तरावर पोहोचला आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांनी तात्काळ उपाययोजना आखत, बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या ताज्या अधिसूचनेनुसार, ५० मीटरपेक्षा उंच असलेल्या इमारतींच्या बांधकामस्थळी २० फूट उंचीचे पत्रे किंवा धातूचे शटिंग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच, सर्व बांधकाम प्रकल्प हिरव्या कपड्याने किंवा ज्यूट शीटने पूर्णतः झाकले जाणार आहेत. त्यामुळे बांधकामांमुळे निर्माण होणारा धूळ व धूर शहराच्या हवेच्या गुणवत्तेला हानी पोहोचवणार नाही. बांधकाम स्थळांवर धूळ व डेब्रिज नियंत्रित ठेवण्यासाठी, बांधकाम साहित्य उतरवताना व वाहतूक करताना पाण्याची फवारणी करावी लागणार आहे. तसेच, प्रत्येक बांधकाम ठिकाणी मोबाइल अँटी स्मोकगनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, जेणेकरून हवेतील धूळ तत्काळ बसावी. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पूर्णपणे ताडपत्रीने झाकलेले असणे आवश्यक आहे आणि या वाहनांची नियमित साफसफाई करावी लागणार आहे. बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण तपासण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सेन्सर-आधारित हवा प्रदूषण मॉनिटर बसवण्याचे आदेश दिले आहेत. हे मॉनिटर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी वापरले जाऊ शकतील, ज्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेवर सतत देखरेख ठेवली जाईल.

उल्हासनगर महापालिकेने दिवाळी सणाच्या काळात फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० या कालावधीतच परवानगी दिली होती. तसेच, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने रात्री ११:५५ ते १२:३० या वेळेतच फटाके फोडता येतील. याचे पालन न केल्यास महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. यामुळे वातावरणात फटाक्यांमुळे होणारा प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील बकरी व्यावसायिकांनी प्रदूषण वाढविणारे इंधन टाळून इलेक्ट्रिक ओवन, पीएनजी किंवा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे हवेतील हानिकारक घटक कमी होण्यास मदत होईल. या उपाययोजनांमुळे शहरातील हवा गुणवत्ता सुधारेल अशी अपेक्षा असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक

महापालिकेने नागरिकांसाठी तक्रार नोंदणीसाठी एक टोल फ्री क्रमांक १८००२३३११०१ उपलब्ध केला आहे. हवेच्या गुणवत्तेवर तक्रार असल्यास नागरिक या क्रमांकावर संपर्क करू शकतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी कडक चेतावणी महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महापालिकेची कडक भूमिका

उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त विकास ढाकणे आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याबाबत केलेल्या विभागस्तरीय बैठकीत, शहरातील हवेचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात कटिबद्धता व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हवेतील प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी हे कडक नियम लागू करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी