ठाणे

उल्हासनगरात स्वीगी बाईकर्सचा संप; ऑनलाईन फूड सेवा ठप्प

“दररोज पेट्रोलचे दर वाढत आहेत, वाहन देखभालीचा खर्च वाढतोय, पण कंपनीने आमचे दर अर्धे केले. इतक्या मेहनतीनंतर फक्त काहीशे रुपयांमध्ये घर चालवणं शक्य नाही,” अशी तक्रार बाईकर्सनी केली.

Swapnil S

उल्हासनगर : ऑर्डर दिली पण डिलेव्हरीच नाही! कारण उल्हासनगरात फूड डिलेव्हरी सेवा ठप्प झाली आहे. स्वीगी बाईकर्सनी कंपनीच्या जाचक अटी आणि दरकपाती विरोधात संप पुकारला असून, मनसेच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आता अधिक जोर आला आहे. ऑनलाईन सुविधांच्या सवयी झालेल्या ग्राहकांना मात्र आता ‘डिजिटल उपवास’ करण्याची वेळ आली आहे.

आधुनिक जीवनात स्वीगी, झोमॅटो सारख्या ऑनलाईन सेवांनी लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग घेतला आहे. घरबसल्या काही मिनिटांत गरमागरम जेवण किंवा किराणा मिळविण्याची सवय आता सर्वांनाच लागली आहे. पण हाच दिलासा देणारा डिजिटल सोयीचा धागा उल्हासनगरात अचानक तुटला आहे.

उल्हासनगर शहरातील बिग सिनेमा परिसरातील सुमारे ३० ते ३५ स्वीगी डिलेव्हरी बाईकर्सनी कंपनीच्या अन्यायकारक धोरणांविरोधात संप पुकारला असून, परिणामी संपूर्ण शहरात स्वीगीची सेवा ठप्प झाली आहे.

संपावर गेलेल्या डिलेव्हरी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी १६ ऑर्डर पूर्ण केल्यावर त्यांना १,००० ते १,२०० रुपये मिळत होते. परंतु आता त्याच ऑर्डरसाठी फक्त ५०० ते ६०० रुपये मिळत आहेत. “दररोज पेट्रोलचे दर वाढत आहेत, वाहन देखभालीचा खर्च वाढतोय, पण कंपनीने आमचे दर अर्धे केले. इतक्या मेहनतीनंतर फक्त काहीशे रुपयांमध्ये घर चालवणं शक्य नाही,” अशी तक्रार बाईकर्सनी केली. त्यांनी आरोप केला की, कंपनी नवीन पॉलिसीच्या नावाखाली जाचक अटी लादत असून, डिलेव्हरी वेळेत पूर्ण न झाल्यास बाईकर्सना दंड किंवा कामातून काढण्याची भीती दाखवली जाते.

मनसेचा ठाम पाठिंबा

या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पष्ट पाठिंबा दिला आहे. मनसेने बिग सिनेमा परिसरातील संपात सहभागी झालेल्या डिलेव्हरी बाईकर्सशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, “कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले तर मनसे रस्त्यावर उतरून लढेल. कामगारांच्या न्यायासाठी आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत.

ग्राहकांसाठी डिजिटल संकटाचा धक्का

उल्हासनगरात गेल्या काही दिवसांत ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्यांची संख्या वाढलेली असताना हा संप ग्राहकांसाठी मोठा धक्का ठरला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रेस्टॉरंट्सकडून ऑनलाईन ऑर्डर्स स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पारंपरिक पद्धतीने हॉटेलांवर जाण्याशिवाय पर्याय नाही.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड

'कॅबला उशीरा झाला, म्हणून...'; गोव्याच्या नाइट क्लबमधील अग्निकांडातून थोडक्यात बचावलेल्या युवकाने सांगितली आपबिती

Goa Nightclub Fire Update : गोव्यातील ‘बर्च’ नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी ५ जणांना अटक; आगीचा नवा व्हिडीओ आला समोर