ठाणे

उल्हासनगरमध्ये दहशतवादी संशयावरून दोघांना अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई; सुरक्षा यंत्रणांची हालचाल वेगवान

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेवाळी परिसरातील आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकर या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेड्या ठोकल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील तणाव, चुकीची संगत आणि मोबाईलवरील अतिरेकी व्हिडीओंमुळे आफताबचा दहशतवादी संघटनांशी संपर्क आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेवाळी परिसरातील आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकर या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेड्या ठोकल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील तणाव, चुकीची संगत आणि मोबाईलवरील अतिरेकी व्हिडीओंमुळे आफताबचा दहशतवादी संघटनांशी संपर्क आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आफताब आपल्या कुटुंबासह नेवाळीत राहत होता. त्याचे वडील मटण विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, तो वारंवार मोबाईलवर अतिरेकी संघटनांचे व्हिडीओ पाहत असे, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले, आफताब जाताना आठ हजार रुपये घेऊन गेला. मी त्याला समजावले, व्यवसायात लक्ष दे, चुकीच्या मुलांसोबत जाऊ नकोस, पण त्याने हट्ट धरला. दिल्ली पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली पण काही संशयास्पद मिळाले नाही.

दिल्लीतील दहशतवादी अटकेचा धागा उल्हासनगरात सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे. संशयास्पद व्यक्तींना भाड्याने घर किंवा दुकान देऊ नये. भाडेकरू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. हे न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वतःही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावी. शहराची सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.
सचिन गोरे, पोलीस उपायुक्त, उल्हासनगर

या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, १० सप्टेंबर २०१४ रोजी कल्याणमधील चार तरुण आयसिसमध्ये सामील झाले होते, आणि नेमक्या दहा वर्षांनी पुन्हा त्याच दिवशी नेवाळी परिसरातील हे दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक साम्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब