ठाणे

कांचनगाव येथील अनधिकृत इमारत जमीनदोस्त

कांचनगाव येथील अनधिकृत इमारतीचे बांधकाम महानगरपलिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आले.

Swapnil S

कल्याण : कांचनगाव येथील अनधिकृत इमारतीचे बांधकाम महानगरपलिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपलिका फ प्रभागक्षेत्र परिसरातील जमीन मालक धनंजय शेलार व विकासक अश्विनी ब्रिजराज पांडे, संदिप मोहन डोके, महेश मधुकर लहाने यांनी फ प्रभाग क्षेत्रातील कांचनगाव डोंबिवली (पूर्व) येथे तळ + ७ मजल्याचे अनाधिकृत आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम केले होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम१९४९मधील कलम ४७८नुसार २० नोव्हेंबर २०२३ रोजी ते अनाधिकृत घोषित करून सुध्दा संबंधितांनी बांधकाम सुरू ठेवल्याने इमारतीच्या भिंती व स्लॅब चे बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. सदर इमारतीच्या आजूबाजूला विद्युत हायटेन्शन वायर असल्याने इमारतीचे दोन मजले ब्रेकर, गॅस कटर व कामगारांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. हाय रिप जॉ क्रशर मशीन व पोकलन, जेसीबी व कामगारांसह निष्कासन कारवाई सुरू ठेवून इमारतीचे तळ + ७ मजले २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पूर्णपणे निष्कासित करण्यात आले.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

बिहार काँग्रेसच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ; राहुल यांनी माफी मागण्याची भाजपची मागणी

बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार