ठाणे

अनारक्षित रेल्वे तिकीट, एटीव्हीएम स्टेशनरीचे अवैध प्रिंटिंग उघडकीस, रेल्वेचे चौकशीचे आदेश

Swapnil S

धर्मेश ठक्कर/मुंबई

भिवंडी व ठाण्यात अनारक्षित रेल्वे तिकीट, एटीव्हीएम स्टेशनरीचे अवैध प्रिंटिंग होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश भारतीय रेल्वेने दिले आहेत.

पूर्व रेल्वेच्या दक्षता विभागाने भिवंडी व ठाणे येथील ग्लोबल पॅकेजिंगच्या कार्यालयावर अचानक छापेमारी केली. तेथे अनारक्षित रेल्वे तिकिटाचे रोल प्रिंटिंग केलेले आढळले. हे रोल पूर्व रेल्वेला पाठवले जाणार होते.

पूर्व रेल्वेने अनारक्षित रेल्वे तिकीट, एटीव्हीएमचे रोल बनवण्याचे कंत्राट क्रिस्टल फॉर्म्स प्रा. लिमिटेडला दिले होते. ७२१०० थर्मल रोलचा त्यात समावेश होता. प्रत्येक रोलमध्ये ५०० तिकिटं होती. क्रिस्टल फॉर्म्स कंपनीने याचे उपकंत्राट ग्लोबल पॅकेजिंगला दिले. विशेष म्हणजे कंत्राटदाराने उपकंत्राट नेमणे हे अवैध आहे. पूर्व रेल्वेच्या दक्षता कार्यालयाने कोलकातातील प्रधान मुख्य मटेरियल मॅनेजरला दिलेल्या गुप्त मेमोची प्रत ‘नवशक्ति’कडे आहे.

हे तिकीट प्रिंटिंग करण्याचे काम आयएसओ सर्टिफाइड प्रिंटिंग प्रेसमध्ये देणे गरजेचे असते. त्याला आरबीआय व भारतीय बँकर असोसिएशनची मान्यता लागते. हे काम करणाऱ्या कंपनीकडे रेल्वे तिकिटांचे प्रिंटिंग करण्याचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक असते, असे उप मुख्य दक्षता अधिकारी धनंजय कुमार यांनी प्रधान मुख्य मटेरियल मॅनेजर, पूर्व रेल्वे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले.

आरबीआय व इंडियन बँकिंग असोसिएशनशी संलग्न नसलेल्या प्रिंटरला हे काम कसे दिले गेले, असा प्रश्न दक्षता विभागाने उपस्थित केला. हे प्रकरण इंडियन बँक असोसिएशनसमोर उपस्थित केले असून संबंधित कंपनीविरोधात कारवाई केली जाणार आहे. ग्लोबल पॅकेजिंग कंपनीने १२ हजार अनारक्षित तिकिटांचे रोल्स पूर्व रेल्वेला दिले, तर क्रिस्टल फॉर्म्स प्रा. लिमिटेडने १८ हजार अनारक्षित तिकिटांचे रोल्स हावड्याला पाठवले. पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त