ठाणे

ठाण्यात वामन म्हात्रेंचा निषेध

बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकारसंघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

Swapnil S

ठाणे : बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकारसंघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन सकाळी ठाणे शहर दैनिक पत्रकारसंघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत वामन म्हात्रेंवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने तेथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल, अशा अश्लील भाषेत पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केले. या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणा टाळाटाळ करत आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वर्तनाचा व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली