ठाणे

रिक्षाचालक गांजा ओढातानाचा व्हिडिओ व्हायरल ; कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

नवशक्ती Web Desk

मुंबईत आता मादक द्रव्याचे प्रमाण खूप वाढले आहे . रोज आपल्याला काहींना काही ऐकायला येते. थोडे दिवसाआधी मुंबई लोकलमध्ये एक माणूस गांजा ओढताना दिसला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील वायरल झाला होता. आता परत एकदा ठाण्याच्या कळवा येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही रिक्षाचालक भरदिवसा चरस गांजा ओढत आहेत. त्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला असून यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मादक द्रव्याची विक्री कुणाच्या आशिर्वादाने होते? असा सवाल प्रत्येक नागरिकांच्या मनात आला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील कळवा रेल्वे स्टेशनवरील असून रिक्षा स्टँडवर तीन ते चार रिक्षा चालक गांजा ओढताना दिसत आहेत. तिथेच उभा असलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. या प्रकारानंतर नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

"कळवा पुर्व स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँड जवळ रिक्षा चालक बिनधास्त चरस गांजा पिताना दिसतं आहेत, कळवा पुर्व परिसरात मादक द्रव्य विक्री केली जाते मादक द्रव्य पिऊन रिक्षा चालक बिनधास्त रिक्षा चालवतात. नशे मध्ये महिलाची छेडछाड किंवा कुठलाही घातक गुन्हा घडू शकतो याची पोलिस प्रशासनाने नोंद घ्यावी." अशी पोस्ट करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा

गाझात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

International Day of Families 2024: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या कुटुंबियांना पाठवा हे शुभेच्छा संदेश!