ठाणे

ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद

शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे

वृत्तसंस्था

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम एम.आय.डी.सी ने घेतले आहे.

परिणामी, शुक्रवार दिनांक पाच अॅागस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० ते सायं. ८.०० वाजेपर्यत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यत (किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. पाणीपुरवठा िवभागाने पाणी कमी दाबाने येणार असल्याचे आधीच सांगितले आहे.

अजित पवारांनी हेगडेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

Mumbai : गोरेगावच्या महाविद्यालयात ड्रेस कोडवरून वाद; विद्यार्थिनींच्या उपोषणानंतर बुरखा बंदी मागे